Department of Marathi
मराठी विभाग

प्रस्तावना (Preface):

जे. ई. एस. महाविद्यालयाची स्थापना इ.स. १९५८ मध्ये झाली असून १६ एकरच्या विस्तीर्ण आणि निसर्गरम्य परिसरात वसलेल्या या ज्ञानमंदिराला ६८ वर्षांची गौरवशाली शैक्षणिक परंपरा लाभलेली आहे. महाविद्यालयाच्या स्थापनेबरोबरच सुरू झालेला मराठी विभाग हा सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांमध्ये वाङ्मयाभिरुची आणि संशोधक वृत्ती निर्माण करण्यात अग्रेसर राहिलेला आहे. या विभागाचे सर्वप्रथम विभागप्रमुख डॉ. शिवाजी गऊळकर हे होते. तत्कालामध्ये जालना जिल्ह्यातील एकमेव पी.एचडी पदवी धारण करणारे ते प्रतिभावंत आणि चिकित्सक अभ्यासक होते. त्यांनी मजबूत केलेल्या पायाभरणीमुळे आजवर या विभागातून अनेक प्रतिभावंत साहित्यिक, कवी, आणि अभ्यासक घडले आहेत. मराठी विभागाचा थोडक्यात परिचय (Brief Introduction) मराठी भाषा व वाङमय विभागाची सुरुवात इ.स. १९५८ मध्ये झाली. आजमितीला या भागाने समाजासमोर गुणवत्तेचा एक आदर्श निर्माण केला असून राष्ट्रीय सेवा योजना व गांधी अध्ययन केंद्र यांसारख्या महत्त्वपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून हा विभाग कायमच समाजाशी जोडला गेला आहे. सद्यस्थितीत, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP २०२०) नुसार पदवीच्या (BA/B.Com/B.Sc) प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षासाठी कौशल्य आणि रोजगाराभिमुख अद्ययावत अभ्यासक्रम राबविण्यात येत आहे. या अभ्यासक्रमात साहित्यासोबतच संवाद कौशल्य, पटकथालेखन, आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व मराठी भाषा यांसारख्या आधुनिक विषयांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. हा विभाग विद्यार्थ्यांना केवळ वाङमयीन ज्ञान देत नाही, तर प्रसारमाध्यमे, स्पर्धा परीक्षा, दुभाषिक, डबिंग, मुद्रितशोधन, आणि जाहिरात लेखन यांसारख्या विविध क्षेत्रांतील करिअरच्या संधींसाठी पूर्णपणे सक्षम बनवितो.
दृष्टी (Vision): भाषा आणि साहित्य संशोधनाला जागतिक स्तरावर प्रोत्साहन देणे, विद्यार्थ्यांची भाषिक आणि वाङमयीन कौशल्ये वृद्धिंगत करणे आणि तंत्रज्ञानाच्या युगात साहित्यविषयक जाण समृद्ध करणे.
मिशन (Mission): विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्याचा विकास करून त्यांच्यातील सुप्त कलागुणांचा शोध घेणे.
साहित्यविषयक जाणिवा प्रगल्भ करणे आणि विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक संशोधन दृष्टीचा विकास करणे.
ध्येय (Goals) • मराठी लेखनविषयक नियम, वर्णमाला, भाषिक वापराची यांत्रिक उपकरणे आणि संगणकीय आज्ञावली यांच्या वापरात सुसूत्रता आणण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे उपलब्ध करणे.
• मराठी भाषेची अंगभूत वैशिष्ट्ये कायम ठेवून भाषासमृद्धीसाठी भाषांतरे, नव्या शब्दांचा स्वीकार, प्रतिशब्दांची निर्मिती, अभिजात व समकालीन साहित्यचर्चा आणि ज्ञान-विज्ञानाच्या क्षेत्रातील पायाभूत प्रवृत्तीप्रवाह मराठीत आणण्यासाठी प्रयत्न करणे.
• विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी मराठीच्या विकासाला पूरक ठरणारी विस्तार सेवा देणे, अल्पमुदतीचे अभ्यासक्रम आखणे आणि इलेक्ट्रॉनिक साहित्यनिर्मिती करणे.
उद्दिष्ट्ये (Objectives): • भाषिक सक्षमीकरण: जागतिकीकरणानंतरचे नवउद्योग, व्यवसाय आणि दृक-श्राव्य माध्यमांतील भाषिक गरजा पूर्ण करणे.
• कौशल्य विकास: सर्जनशील लेखन, अनुवाद, उपयोजित आणि सर्जक भाषा वापराची कौशल्ये विकसित करणे.
• ज्ञाननिर्मिती: व्यवहारभाषा, प्रशासनिक भाषा आणि ज्ञानभाषा या तिन्ही स्तरांवर मराठी भाषेचा सर्वांगीण वापर वाढविण्यासाठी विविध भाषिक कौशल्यांचा विकास करणे व नवीन परिभाषेची घडण करणे.
• बोलीभाषा संवर्धन: सामान्यजनांची मराठी बोलीभाषा आणि प्रमाणभाषा यांच्यातील अभिसरण वाढवून समवर्ती संबंधातून मराठी भाषा अधिकाधिक लोकाभिमुख व समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करणे.
• सामाजिक बांधिलकी: शेतकरी, कामगार, मुले, स्रिया, आदिवासी इत्यादी वंचित घटकांच्या हितासाठी व विकासासाठी माध्यमभाषेचा सर्जनशील वापर वाढविण्याकरिता भाषिक उपक्रमांचे आयोजन करणे.
• अभ्यासक्रमाचे वेगळेपण: (Academic Highlights under NEP 2020) पदवी स्तरावर (BA/B.Com/B.Sc) अत्यंत नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम शिकवला जातो:
• साहित्य प्रकार व मूल्ये: कथा, कविता, नाटक, चरित्र आणि आत्मचरित्र यांसारख्या साहित्य प्रकारांचा अभ्यास आणि सौंदर्यमूल्यांची जपणूक.
• कौशल्य विकास (SEC & VSC): समाज माध्यमांवरील लेखन, जाहिरात लेखन, मुलाखत तंत्र, चित्रपट/नाट्य परीक्षण, पटकथालेखन, गीतलेखन तंत्र आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व मराठी भाषा यांसारखे उपयोजित विषय.
• भारतीय ज्ञानप्रणाली (IKS): संत साहित्य, वारकरी संप्रदाय व इतर मध्ययुगीन साहित्यातील तत्त्वज्ञान, तसेच गाथासप्तशती व शिलालेख यांमधून मौखिक आणि पारंपरिक ज्ञानाचा अभ्यास.

माजी विभाग प्रमुख...(Ex-heads)

  • डॉ.शिवाजी गऊळकर  (१९५८-१९९३)
  • प्रा. प्रभाकर कुलकर्णी (१९९३-२००१)
  • डॉ. के.जी.सोनकांबळे  (२००१-२०१९)