
मुलांसाठी वसतिगृह :
महाविद्यालयाने बाहेर गावाहून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी अद्यावत व सर्व सोयींनी युक्त अशा वसतिगृहाची सोय केलेली असून त्या विद्यार्थ्यांच्या निवासाची उत्कृष्ट व्यवस्था केली आहे. वसतिग्रहात प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयालत प्रवेश घेतल्यानंतर वसतिगृहासाठी स्वतंत्र प्रवेश अर्ज भरून दाखल करावा.
वसतिगृह प्रवेश अर्ज मंजूर करण्याचे अधिकार प्राचार्याना राहतील. प्रवेश अर्ज मान्य झाल्यावरण विद्याध्यांनी वसतिगृहाचे खालील प्रमाणे शुल्क एकदाच भरावे. प्रवेश घेतेवेळी भरलेले शुल्क कोणत्याही कारणाने परत मिळणार नाही.
प्रवेश शुल्क : ५००/-
वार्षिक शुल्क : १२,०००/-
वीज शुल्क : १,५००/-
अनामत रक्कम : १,०००/-
एकूण : १५,०००/-
वसतिगृहातील छोट्या रूममध्ये दोन व मोठ्या रूममध्ये तीन विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था करून घ्यावयाची आहे. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यास वसतिगृहाच्या नियमांचे व शिस्तीचे पालन करणे बंधनकारक आहे. वसतिगृह प्रमुखांनी वेळोवेळी केलेल्या सूचनांचे पालन करावे लागेल. कोणत्याही प्रकारचे अशिष्ट वर्तन करणे व शिस्त न पाळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचा प्रवेश रद्द केला जाईल.