
मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह
महाविद्यालयाने बाहेर गावाहून आलेल्या विद्यार्थीनीसाठी अद्यावत व सर्व सोयींनी युक्त अशा वसतिगृहाची सोय केलेली असून त्या विद्यार्थीनींच्या निवासाची उत्कृष्ट व्यवस्था केली आहे. वसतिहात प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनीने महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर वसतिगृहासाठी स्वतंत्र प्रवेश अर्ज भरून दाखल करावा.
प्रवेश शुल्क : ५००/-
वार्षिक शुल्क : १२,०००/-
वीज शुल्क : १,५००/-
अनामत रक्कम : १,०००/-
एकूण : १५,०००/-
वसतिगृहातील छोट्या रूममध्ये दोन व मोठ्या रूममध्ये तीन विद्यार्थ्यांनी राहण्याची व्यवस्था करून घ्यावयाची आहे. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थीनीस वसतिगृहाच्या नियमांचे व शिस्तीचे पालन करणे बंधनकारक आहे. वसतिगृह प्रमुखांनी वेळोवेळी केलेल्या सूचनांचे पालन करावे लागेल. कोणत्याही प्रकारचे अशिष्ट वर्तन करणे व शिस्त न पाळणाऱ्या विद्यार्थ्यानीचा वसतिगृहाचा प्रवेश रद केला जाईल.