Introduction:
जे.ई.एस.महाविद्यालयाची स्थापना इ.स.१९५८ मध्ये झाली. या शिक्षण संस्थेत स्थापनेपासूनच मराठवाडा, विदर्भ व त्या बाहेरीलही विद्यार्थी शिक्षण घेतात. महाविद्यालयाच्या स्थापनेबरोबरच अनेक विषयांचे विभागही सुरु झाले. त्यातीलच एक मराठी विभाग. हा विभाग सुरुवातीपासूनच अतिशय समृद्ध असा वाङमयाभिरुची निर्माण करण्यात अग्रेसर राहिलेला विभाग आहे. या विभागाचे सर्वप्रथम विभाग प्रमुख डॉ.शिवाजी गऊळकर हे होते. डॉ.गऊळकर हे तत्कालामध्ये जालना जिल्ह्यातील एकमेव पी.एचडी पदवी धारण करणारे प्रतिभावंत, चिकित्सक अभ्यासक होते.त्यांनी महाविद्यालयाच्या स्थापनेबरोबरच मराठी विभागाची पायाभरणी मजबूत केली. त्यामुळे मराठी विभागातून अनेक प्रतिभावंत साहित्यिक, अभ्यासक निर्माण झालेले आहेत.
आजमितीला मराठी विभागाने समाजासमोर गुणवत्तेचा एक आदर्श निर्माण केलेला आहे. राष्ट्रीय सेवा योजना, गांधी अध्ययन केंद्र अशा महत्त्वपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून मराठी विभाग कायमच समाजाशी बांधला गेला आहे. तसेच समाजातील साहित्य, रसिक व विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला चालना देण्यासाठी सातत्याने विविध वाङमयीन उपक्रमाचे आयोजन करीत आहे. वाङमयाच्या अभिरुचीपासून ते आजच्या स्पर्धायुक्त गतिमान कालखंडात विद्यार्थ्यांच्या हितासाठी विभाग कटिबद्ध आहे.
स्थापना.. (Establishment)
जे.ई.एस.महाविद्यालयातील मराठी भाषा व वाङमय विभागाची सुरुवात इ.स.१९५८ मध्ये झालेली आहे.
दृष्टी...(Vision)
भाषा आणि साहित्य संशोधनाला प्रोत्साहन, भाषिक आणि वाङ्मयीन कौशल्ये, साहित्यविषयक जाण वृद्धिंगत करणे.
मिशन...(Mission)
विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्याचा विकास व सुप्त गुणांचा शोध
साहित्य विषयक जाणिवा व संशोधन दृष्टीचा विकास
ध्येय...(Goals)
मराठी लेखनविषयक नियम, वर्णमाला, भाषिक वापराची यांत्रिक उपकरणे, संगणकीय आज्ञावली यांच्या वापरात सुसूत्रता आणण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे उपलब्ध करणे.
मराठी भाषेची अंगभूत वैशिष्ट्ये कायम ठेऊन भाषासमृद्धीसाठी भाषांतरे, नव्या शब्दांचा स्वीकार, प्रतिशब्दांची निर्मिती, अभिजात व समकालीन साहित्यचर्चा आणि ज्ञान-विज्ञानाच्या क्षेत्रातील पायाभूत व मौलिक प्रवृत्तिप्रवाह मराठीत आणण्यासाठी प्रयत्न करणे.
विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी मराठीच्या विकासाला पूरक ठरणाऱ्या विस्तार सेवा देणे, अल्पमुदतीचे अभ्यासक्रम आखणे, परस्पर सहकार्याने पाठ्यक्रम, पुस्तकनिर्मिती व इलेक्ट्रॉनिक साहित्यनिर्मिती करणे.
उद्दिष्ट्ये...(Objectives)
जागतिकीकरणानंतरचे नवउद्योग, व्यवसाय आणि दृक –श्राव्य माध्यमांतील भाषिक गरजा पूर्ण करणे.
सर्जनशील लेखन, अनुवाद, उपयोजितआणि सर्जक भाषा वापराची कौशल्ये विकसित करणे.
व्यवहारभाषा, प्रशासनिक भाषा आणि ज्ञानभाषा या तिन्ही स्तरांवर मराठी भाषेचा सर्वांगीण वापर वाढविण्यासाठी विविध भाषिक कौशलयांचा विकास करणे.
मराठी भाषेतून ज्ञान निर्मिती होण्यासाठी नवीन परिभाषेची घडण, निरनिराळ्या ज्ञानस्त्रोतांची उपलब्धता, भाषेचा सर्जनशील वापर वाढविण्यासाठी कृतिकार्यक्रमांना प्रोत्साहन देणे.
सामान्यजनांची मराठी बोलीभाषा आणि प्रमाणभाषा यांच्यातील अभिसरण वाढवून समवर्ती संबंधातून मराठी भाषा अधिकाधिक लोकाभिमुख व समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करणे.
शेतकरी, कामगार, मुले, स्रिया, आदिवासी इत्यादी वंचित घटकांच्या हितासाठी व विकासासाठी माध्यमभाषेचा सर्जनशील वापर वाढविण्याकरिता विविध उपक्रम हाती घेणे. तसेच व्यक्तीच्या सक्षमीकरणामध्ये भाषेचा महत्त्वाचा वाटा असतो हे लक्षात घेऊन भाषिक उपक्रमाचे आयोजन करणे.
माजी विभाग प्रमुख...(Ex-heads)
- डॉ.शिवाजी गऊळकर (१९५८-१९९३)
- प्रा. प्रभाकर कुलकर्णी (१९९३-२००१)
- डॉ. के.जी.सोनकांबळे (२००१-२०१९)