उपलब्ध सुविधा व उपक्रम


पुस्तक पेठी :

महागाईमुळे गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना क्रमिक पुस्तके विकत घेता येत नाहीत. अशा विद्यार्थ्यांना वर्षाभरासाठी क्रमिक पुस्तके देण्यात येतात. सर्व विषयांची र्देदार क्रमिक पुस्तके पुस्तकपेढीसाठी ठेवण्यात येतात.

विद्यार्थी संसद :
'महाराष्ट्र विद्यापीठ कायदा २०१७' प्रमाणे या शैक्षणिक वर्षांसाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची विद्यार्थी संसद खालील प्रमाणे गठीत करण्यात येईल.
अ) अध्यक्ष : वरिष्ठ महाविद्यालयातील पूर्णवेळ अभ्यासक्रमात प्रवेशित पात्र विद्यार्थ्यांच्या द्वारे निर्वाचित.
ब) सचिव : वरिष्ठ महाविद्यालयातील पूर्णवळ अभ्यासक्रमात प्रवेशित पात्र विद्यार्थ्यांच्या द्वारे निर्वाचित.
क) महिला प्रतिनिधी: वरिष्ठ महाविद्यालयातील पूर्णवळ अभ्यासक्रमात प्रवेशित पात्र विद्यार्थ्यांद्वारे निर्वाचित.
ड) मागासवर्गीय प्रतिनिधी : (SC / ST / DNT / NT / OBC यापैकी विद्यापीठाद्वारे निदेशित केल्या प्रमाणे)
वरिष्ठ महाविद्यालयातील पूर्णवेळ अभ्यासक्रमात प्रवेशित पात्र विद्यार्थ्यांद्वारे निर्वाचित.
इ) वर्ग प्रतिनिधी : वरिष्ठ महाविद्यालयातील पूर्णवेळ अभ्यासक्रमात प्रवेशित पात्र विद्यार्थ्यांद्वारे त्या-त्या
वर्गासाठी निवडणूकीच्या माध्यमातून निर्वाचन.
फ)) राष्ट्रीय सेवा योजना, २) राष्ट्रीय छात्र सेना, ३) क्रीडा, ४) सांस्कृतिक मंडळ
या मधून प्रत्येकी एक (१) या प्रमाणे ठरवून दिलेल्या निकषाच्या आधारे प्राचार्याद्वारे नेमणूक.
ग) वरिष्ठ प्राध्यापक: समन्वयक विद्यार्थी संसद, संचालक क्रीडा व शारीरिक शिक्षण, रासेयो कार्यक्रमाधिकारी,
राष्ट्रीय छात्रसेना अधिकारी.

  • संगणक कक्ष :
    २१ व्या शतकात या स्पर्धात्मक युगात आपल्या विद्यार्थ्यांनाही अग्रेसर रहावे, यासाठी 'श्रीमती जमुनाबाई शिवरतन बगडिया संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान विभाग' या स्वतंत्र संगणक विभागाची सुरूवात करण्यात आली असून संगणक शिक्षणाची वाढती मगणी लक्षात घेऊन एकूण ४ अद्यावत संगणक प्रयोगशाळा आहे. या विभागात ११ वी व १२ वी विज्ञान, कला व वाणिज्य शाखेसाठी माहिती व तंत्रज्ञान बी.एस्सी.व बी.कॉम.च्या विद्यार्थ्यासाठी संगणक शिक्षणाची सोय उपलब्ध आहे.

    सांस्कृतिक मंडळ :
    विद्यार्थ्यांच्या अभिनय, गायन, वादन, नृत्य इत्यादी सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी हे मंडळ कार्य करीत आसते. एकांकिका, नाटक, पथनाट्य सादर करणे, अंतरमहाविद्यालयीन स्पर्धा आणि विद्यापीठाच्या युवक महोत्सवात सहभागी होण्याची संधी देणे इत्यादी कामे या मंडळातर्फे केली जातात.

    वाङ् मय मंडळ :
    विद्यार्थ्यांच्या मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील वैचारिक आणि ललित वाङ्मय कविता, कथा, वैचारिक साहित्य इत्यादी लेखन गुणांच्या विकासासाठी हे मंडळ प्रयत्न करते व विविध स्पर्धांचे आयोजन करीत असते.

    विज्ञान मंडळ :
    आजचे युग हे विज्ञान तंत्रज्ञानाचे युग आहे याची जाणवी ठेवून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक विचार आणि शास्त्रीय दृष्टीकोण विकसित करण्याचे कार्य हे मंडळ करते. त्यात विज्ञानाच्या नव नवीन संशोधन आत्याधुनिक तंत्रज्ञान आशा विचारांवर चर्चा घडविणे, छोटे सायंटिस्ट, विज्ञान प्रदर्शन व प्रश्नसंच सारखे कार्यक्रम आयोजित करण्याचे कार्य होते.

    महाविद्यालयाचा वार्षिकांक 'विकास' :
    महाविद्यालयातर्फे इंग्रजी, मराठी व हिंदी भाषेतील माध्यमातून 'विकास' या नावाने वार्षिकांक प्रकाशित करण्यात येतो. त्या प्राधान्याने नवलेखक विद्यार्थ्यांचे व प्राध्यापकांचे लिखाण प्रसिद्ध केले जाते. विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीस वाव देणाऱ्या प्रकाशनातून महाविद्यालयाचे अंतरंग व्यक्त होते.

    क्रीडा विभाग :
    महाविद्यालयाचा क्रीडा विभाग विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या खेळात प्राविण्य मिळविण्यासाठी उपयुक्त असे मार्गदर्शन करतो. जिल्हास्तरिय व आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा, तालुका क्रीडा महोत्सव अशा विविध स्पर्धेत भाग घेण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देते. क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस, कबड्डी, खो-खो, कुस्ती, तिरंदाजी व जिम्नॅस्टिक्स इत्यादी खेळांची व्यवस्था केली असून आवश्यक असणाऱ्या साहित्याची भरपूर तरतूद केली आहे. विद्यार्थ्यांनी या सोयीचा लाभ घ्यावा.

    राष्ट्रीय छात्र सेना (एन.सी.सी.) :
    ५० महाराष्ट्रात बटालियन एन.सी.सी.च्या कक्षेअंतर्गत एक कंपनी महाविद्यालयात आहे. त्यात ५३ विद्यार्थी व ५३ विद्यार्थीनींना प्रवेश दिला जातो. या योजनेअंतर्गत लष्करी, शिक्षण, शिबिरे, गणवेश इत्यादीसाठी शासनातर्फे सोयी दिल्या जातात. भविष्यामध्ये सैन्यदलात काम करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना पायाभूत शिक्षण एन.सी.सी. द्वारे प्राप्त होऊ शकते. तसेच एन.डी.ए. व सी.डी.एस परीक्षेला ही बसता येते. आर.डी.कॅम्प व एन.सी.सी.च्या वतिने विविध प्रशिक्षण शिबिरात सहभागी होता येते.
    1. NCC 'C' प्रमाणपत्र प्राप्त कॅडेटसना आर्मी, नेव्ही व एअरफोर्समध्ये विशेष सवलत दिले जाते.
    2. NCC 'C' प्रमाणपत्र प्राप्त कॅडेटसना आर्मी भरतीमध्ये लेखी परीक्षेतून सुट दिली जाते.

    राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) :
    डॉ. बा. आं. मराठवाडा विद्यापीठाच्या परवानगी अनुसार या योजनेत ३00 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, श्रमप्रतिष्ठा व कलागुणांच्या विकासासाठी विधि उपक्रम राबविले जातात. त्यांच्या व्यक्तीमत्त विकासासाठी मान्यवरांची व्याख्याने, वार्षिक शिबिरे इत्यादीचे आयोजन केले जाते, विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाबरोबर ग्रामीण भागातील अडची समजावून घेऊन त्या दूर करण्याची संधी दिली जाते.

    महात्मा गांधी अध्ययन केंद्र :
    विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांच्या सहकार्याने महाविद्यालयात मागील १२ वर्षांपासून महात्मा गांधी अध्ययन केंद्र सुरू करण्यात आले आहे. महात्मा गांधींच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणे हा या केंद्राचा उद्देश आहे. या केंदाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यासाठी राज्यस्तरीय गांधी विचार अभ्यास शिबिराचे आयोजन दरवर्षी केले जाते. त्याचबरोबर गांधी विचार प्रेरणा परीक्षा, राज्यस्तरीय निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन, शिक्षकांसाठी कार्यशाळा, महिला, शेतकरी यांच्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन या माध्यमातून केले जाते. तसेच गांधी शांती पदयात्रा, सायकल रॅली, रक्तदान, ग्रामस्वच्छता, कारागृहातील कैद्यांसाठी गांधी विचार परीक्षा, शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम घेतले जातात.

    छोटे सायंटिस्ट :
    जालना जिल्हा शैक्षणिकदृष्ट्या मागास जिल्हा आहे. जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी तसेच त्यांच्यात वैज्ञानिक जाणिव विकसित व्हाव्यात यासाठी पुणे येथील ज्ञानप्रबोधिनी आणि केपीआयटी यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील २५ शाळांमध्ये हा उपक्रम घेण्यात येत आहे. यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना ज्ञानप्रबोधिनीच्या वतिने वर्षभराचे छात्रप्रबोधन नियतकालिकांचे अंक व साहित्य देण्यात येते.

    करिअर कौन्सलींग अॅण्ड प्लेसमेंट सेल :
    प्रशासकिय पदांसाठी तथा यशस्वी उद्योजक बनून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे या दृष्टीने त्यांना योग्य दिशेने मार्गक्रमण करण्यासाठी मार्गदर्शन करणे. तसेच विद्यार्थ्यात विविध आस्थापनांवर, पदांवर सक्षमपणे कार्य करण्यास व्यवसायाभिमूख कौशल्य विकसित करणे हे या विभागाचे उद्दिष्टे असून नावीन्यपूर्ण व बाजाराची गरज ओळखून कौशल्य आधारित अभ्यासक्रम राबवून मुलांना सक्षम बनविणे या हेतूने महाविद्यालयात करिअर कौन्सलींग अॅण्ड प्लेसमेंट सेल हा विभाग सुरू आहे. विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा यासाठी दरवर्षी विविध आस्थापनांचा कॅम्पस मूलाखतींचे महाविद्यालयात आयोजन करण्यात येत असते.

    कमवा आणि शिका योजना :
    या योजनेतंर्गत वरिष्ठ महाविद्यालयातील निवडक होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना ३ महिन्यासाठी दररोज २ तास श्रमाच्या मोबदल्यात आर्थिक उत्पन्न प्राप्त करण्याची संधी दिली जाते.

    स्वयंम पोर्टल :
    भारत सरकारच्या मान्व संसाधन मंत्रालयाच्या वतीने सुरु करण्यात आलेले स्वयंम पोर्टल महाविद्यालयात सुरु करण्यात आलेले असून या पोर्टलच्या सहाय्याने विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन ४२०० पेक्षा जास्त विनामुल्य अभ्यासक्रम उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. नियमीत अभ्यासक्रमाबरोबरच हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना पूर्ण करता येऊ शकते. या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी Android App Swayam google Play store मधून Download करुन Email द्वारे Registration करुन घ्यावे व आपला अभ्यासक्रम निवडावा व यासंबंधी अधिक माहितीसाठी डॉ. यु. पी. मोगले, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख यांच्याशी संपर्क साधावा.

    स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग :
    वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उज्वल भवितव्य घडविण्यासाठी मार्गदर्शन वर्ग सुरु करण्यात आलेले आहेत. या संबंधीचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा.

    स्पोकन इंग्लीश वर्ग :
    वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना इंग्लीश भाषा संवाद कौशल्य विकसित करण्यासाठी स्पोकन इंग्लीश अभ्यास वर्ग सुरु करण्यात आलेले आहे.

    स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम :
    माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने आणि आर्थिक सहाय्याने वर्ष २०१८-१९ पासून स्पर्धा परीक्षेसाठी सर्व सोयीने युक्त अद्ययावत अभ्यासिका सुरु करण्यात आलेली असून स्पर्धा परीक्षेसाठी पुरेशा प्रमाणात नवीन पुस्तके आणि मासिक पत्रिका उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.

    भाषा प्रयोगशाळा :
    भाषा विषयांचा तंत्रशुद्ध, सखोल आणि परिपूर्ण अभ्यासासाठी वर्ष २०१९-२० पासून भाषा प्रयोगशाळा सुरु करण्यात येत आहे.

    Wi-Fi Connection :
    विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने परिणामकारक आणि परिपूर्ण शिक्षण उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने वर्ष २०१९-२० पासून महाविद्यालयात वाय फाय करण्यात येत आहे. वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या सवलतीचा जास्तीत जास्त उपयोग घ्यावा.

    इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्र :
    इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ हे राष्ट्रीय दर्जाचे विद्यापीठ असून भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठे मुक्त विद्यापीठ म्हणून युनोस्केने सन २०१० साली घोषित केलेले आहे. आपल्या महाविद्यालयामध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ 'इग्नू' च्या रेग्यूलर स्टडी सेंटरची सुरूवात डिसेंबर २०१३ पासून झाली आहे. इच्छा असूनही काही कारणांमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहिलेल्या सर्वांसाठी दर्जेदार उच्च शिक्षणाची सोय या केंद्रामार्फत केली जात आहे. येथे नौकरी-व्यवसाय करीत असलेल्यांसाठी राष्ट्रीय स्तरावरची पदवी संपादित करता येईल. यासाठी वयाचे कोणतेही बंधन नाही. यावर्षी येथे बी.ए., बी.कॉम., एम.ए., इंग्रजी व हिंदी आणि एम.कॉम. हे अभसक्रम सुरू झाले आहे. या व्यतिरिक्त ज्यांनी शालेय व महाविद्यालयीन स्तरावरचे कोणतेही नियमित शिक्षण पूर्ण करू शकले नाही. अशांसाठी बी.पी.पी.हे अभ्यासक्रम सुरू आहे. हे अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना त्यांनंतर पदवीसाठी बी.एस./बी.कॉम. अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध आहे
    यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्र :

    महाराष्ट्र शासनाने सन १९८९ साली महाराष्ट्राचे थोर सुपुत्र यशवंतराव चव्हाण यांच्या नावने नासिक येथे मुक्त विद्यापीठाची स्थापणा केलेली आहे. सामाजिक समता व न्याय प्रस्थापित करण्यासाठी शासनाने उचललेल्या पावलांपैकी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. आर्थिक परिस्थितीतीमुळे समाजातील ज्या व्यक्तींना आपले शिक्षण अर्धवट सोडून द्यावे लागले अशांना शिक्षणाची द्वारे पुन्हा एकदा मुक्त विद्यापीठाच्या रूपाने खुली करण्यात आलेली आहेत. वयाची १८ वर्ष पूर्ण झालेल्या कोणत्याही व कितीही शिक्षण झालेल्या व्यकतींना बी.ए. व बी.कॉम. ची पदवी संपादन करण्याची संधी नव्याने उपलब्ध झालेली आहे. मुक्त विद्यापीठाचे अधिकृत अभ्यासकेंद्र म्हणून या महाविद्यालयाला मान्यता मिळालेली आहे. त्यात विविध विषयासाठी अभ्यासक्रम राबविण्यात येत आहेत.

    संशोधन केंद्र :
    महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, भौतीकशास्त्र, रसायनशास्त्र, हिंदी, अर्थशास्त्र, वाणिज्य, विभागाला संशोधन केंद्र म्हणून डॉ. बा. आं. मराठवाडा विद्यापीठाची मान्यता प्राप्त आहे. तसेच गेल्या कित्येक वर्षापासून विविध विभागात पीएच. डी. साठी संशोधनाचे कार्य होत आहे. Astronomy & Astrophysics या विषयात संशोधन कार्य करण्याकरिता एक १२th Telescope आणि Photometer ची व्यवस्था असलेली अद्यावत प्रयोगशाळा सुरू आहे. या संशोधन केंद्रात पीएच.डी. साठी पदव्युत्तर पदवी प्राप्त झालेल्या विद्यार्थ्याना व प्राध्यापकाना संशोधन करण्याची सुविधा उपलब्ध केली जाते.

  • Copyright © 2021. This is the official Website of J. E. S. College, Jalna (M. S.) India